दिशादर्शक
विषय
अनुक्रमांक प्रमुख कामगिरी
1 इट्झ कॅश पथदर्शी प्रकल्प - आधार ब्रीज पेमेंटच्या माध्यमातून रू. १००/- प्रदान करणारे आणि इट्झ कॅश प्रीपेड कार्डासह लाभार्थी खाते संबद्ध करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
2 प्रधान सचिव - माहिती तंत्रज्ञान यांनी वर्ष २०१३-१४ चा ई-प्रशासन अहवाल प्रकाशित केला
3 महाराष्ट्र राज्याने सुमारे ९ कोटी युआयडी नोंदणीचा टप्पा गाठला आहे.
4 केंद्र शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये आधार पेमेंट ब्रिज तथा एपीबी मार्फत रू.1/- इतकी रक्कम जमा करणारे महाराष्ट्र, हे पहिले राज्य आहे.
5 माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. राजेश अग्रवाल यांच्या हस्ते विविध विकलांग नागरिकांच्या युआयडी-आधार नोंदणीसाठी मुंबईतील दादर भागात प्रगती विद्यालय येथे आधार मोबाईल व्हॅनचे उद्घाटन झाले.
6 माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव श्री. राजेश अग्रवाल यांना श्री. अरूण मायरा, सदस्य, योजना आयोग, भारत सरकार, यांच्या हस्ते मुंबईत सीएनबीसी पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
7 १ जानेवारी २०१३ पासून थेट रोख हस्तांतरण ची यशस्वी स्थापना
8 देशामध्ये यूआयडी निर्मितीचे क्रमांक १ चे निबंधक
9 मा. पंतप्रधानांकडून ऑक्टोबर २०१२ मध्ये यूआयडी साठी नवीन उपक्रमाबद्दल राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त
10 प्रथम युआयडी आणि लोकसंख्याशास्त्रीय माहितीचा स्वच्छ स्वरूपातील साठा उपलब्ध करून देणा-या युएसआरडीएच (वापरायोग्य आणि अद्ययावत एसआरडीएच) ची संकल्पना सादर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
11 राज्य नागरिक डेटा हब ची अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य
12 यूआयडी क्रमांकांद्वारे थेट रोख हस्तांतरणाचा प्रयोग करणारे प्रथम राज्य
13 मा. अध्यक्ष यूआयडीएआय कडून २०११ मध्ये जास्तीत जास्त यूआयडी नावनोंदणी केंद्र स्थापन केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त
14 स्वयं मानांकनाची संकल्पना सादर केली, जी आता यूआयडीएआय द्वारे स्वीकारली गेली आहे.
15 वर्धा हे पुढील लक्ष आहे आणि संपूर्ण मानांकनासाठी देशातील हा प्रमुख जिल्हा आहे
16 यूआयडी नावनोंदणी केंद्रांच्या सक्षम लेखापरिक्षण तंत्रज्ञानासाठी अँड्रॉईड आधारित अनुप्रयोग सादर केलेले केवळ हे एकच राज्य आहे
17 महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील टेंबळी गावातील रहिवासी रंजना सोनावणे यांना पहिला युआयडी क्रमांक जारी करण्यात आला
18 सप्टेंबर 2010 मध्ये महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातून युआयडी कार्यक्रमाला देशस्तरावर प्रारंभ झाला